स्मार्टबसने तरुणास उडवले...

Foto

अदालतरोडवरील सकाळची घटना

 कामावर डबा घेऊन निघालेल्या पादचारी तरुणास पाठीमागून सुसाट वेगात आलेल्या मनपाच्या शहर बसने चिरडले.या अपघातात तरुण गंभीररीत्या जखमी झाला असून ही घटना आज सकाळच्या सुमारास अदालत रोडवर घडली. जखमींची ओळख पाठविण्याचे काम सुरू होते.
आज सकाळी 35 ते 40 वयोगटातील एक तरुण डबा घेऊन अदालत रोड वरून पायी जात असताना जिल्हा मध्यवर्ती बँके समोर पाठीमागून आलेल्या (एम.एच.20 ई. एल.3145) या क्रमांकाच्या मनपा शहरबसने पादचारी तरुणास उडवले व त्यानंतर  सुमारे 10 ते 15 फूट तरुणास फरपटत नेले.बस कठड्याला धडकून फुटपाथवर चढली सुमारे 20 फूट फुटपाथवर पुढे गेल्यावर  चालकाने बस नियंत्रणात आणली. अपघात झाल्याचे पाहून नागरिकांनी धाव घेत बसच्या खाली पाट्याजवळ रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या तरुणाला बाहेर काढले.दरम्यान वाहतूक पोलिसांनी घटनस्थळी दाखल होत.त्याच शहर बसमधून जखमी तरुणाला रुग्णालयात हलविले.या अपघाताची पोलिसात नोंद घेण्यात आली आहे.पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले असून पोलीसाकडून जखमींची ओळख पटविण्याचे काम सुरू होते.जखमी तरुणांचा जेवणाचा डबा आणि बूट घटनस्थळावरच पडून होते.
बसमधून कोरोना बधितांची वाहतूक
ज्या बसचा अपघात झाला ती बस कोरोना बधितांची संपर्कातील व कोरोना बधितांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येत होती.ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी बस रिकामी होती. नागरिकांनी जखमी तरुणाला बस मध्ये हलविले.ती बस निर्जंतुकीकरण केलेली होती का? हे स्पष्ठ झाले नाही.